बापू साहेब ठाकरे (संपादक )
अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाला विरोध, दर्शवत शिंदखेडा तालुक्यात हजारो समाज बांधवांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढला. शिंदखेडा तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात तालुक्यातील विविध गावांमधील अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या सर्व ५९ उपजातींचे हजारो नागरिक सहभागी झाले होते . यावेळी उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
