बापू साहेब ठाकरे (संपादक )
काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे
1.मोवी ते डेडीयापाडा मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला त्यामुळे सदर मार्गावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे तसेच
2.नेतरंग ते डेडीयापाडा मार्गावरील फुलवाडी जवळील जुन्या ब्रिजवरूनही अवजड माल वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
त्यामुळे गवाली येथील ट्राफिक पूर्ण बंद झालेली आहे
नर्मदा जिल्ह्यातील देडियापाडा आणि सागबारा तालुक्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे! सततच्या मुसळधार पावसामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः चिकडा तालुक्यातील उमरान गावात, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तात्पुरता पर्यायी रस्ता वाहून गेला असून, देडियापाडा आणि सागबाराला जोडणारे सर्व मुख्य रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.

